रमेश औताडे
मुंबई : पुणे जिल्ह्यात पुनर्वसन जमीनीची खोटी संपादन शीटे बनवून त्यावर भुमी-अभिलेख कार्यालयाचे शिक्के घेऊन  प्रमाणित भासवून काही व्यक्ती शासन व प्रकल्पग्रस्त यांची करीत असलेली फसवणूक याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या निवेदनानुसार महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चासकमान, गुंजवणी व इतर काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शासनाने शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, जातेगाव भागात केलेले आहे. एकाच जमिनीची दोन संपादनशीटे दाखवून अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्त यांना जमिनी ताब्यात दिलेल्या नाहीत,त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त त्रस्त होऊन जमिनी विकत आहेत ही बाब गंभीर असल्याचे टाव्हरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी काही व्यक्ती गेली काही वर्षे दोन संपादनशीटे आहेत,मुळ मालकांवर अन्याय झाला आहे असे सांगून शासन व महसुलमंत्री यांच्याकडे पाठपुराव्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले होते,त्यानुसार अनेक प्रकरणी शासन व मंत्रीमहोदयांनी चौकशीचे निर्देश दिले होते.काही बाबतीत मुळ मालकांवर अन्याय होत आहे,तिथे न्याय मिळणे आवश्यक आहे,परंतु शिक्रापूर परिसरातील एका शेतकऱ्याची ३ एकर पुनर्वसनासाठी संपादित झाली होती.
संबधित गट ३ एकर २९ गुंठे क्षेत्राचा होता.प्रकल्पग्रस्त व्यक्तीने इतरांना सदर जमीन विक्री केली होती,ताबा यापुर्वी शासनाने दिला होता; परंतु दोन संपादनशीटे असल्याचे दाखवून मोजणी करण्यास विरोध केला जातो व त्यातून महसुल मंत्री यांच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी अहवाल  दोन महिन्यापुर्वी स्थगिती दिली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असलेल्या एका वकीलाला टाव्हरे यांनी दोन संपादनशीटे कशी तयार होतात अशी महिन्यापुर्वी विचारणा केल्यानंतर त्याने तो स्वतः बनवून उपअधिक्षक भुमी-अभिलेख शिरूर कार्यालयातून त्यावर शिक्के घेऊन प्रमाणित भासवतो असे सांगितले व अनेक प्रकरणी त्याच पद्धतीने केल्याचे सांगितल्यानंतर टाव्हरे यांनी याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी शासनाकडे केल्यानंतर महसुलमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून प्रसंगी आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *