– नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते उदघाट्न

दिवा : दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील गुरुदर्शन नगर येथे ‘वचनपूर्ती’ रस्त्याचे लोकार्पण रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. स्थानिक रहिवासी नागरिकांच्या दैनंदिन ये- जा करण्याच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विकासकामांचे आश्वासन पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत परिसरातील प्रलंबित विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणूक काळात नागरिकांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या कामाची वचनपूर्ती केले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

सदर लोकार्पण सोहळ्यास कैलेश पाटील, भालचंद्र भगत, दिपराज पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गुरुदर्शन नगरमधील किरण जाधव, राजा भंडारी, रमेश कडवेकर, मंगेश सकपाळ, आदित्य कदम, समीर भारद्वाज, पप्पू साळवी, विजय जैस्वाल, अशोक कदम, सुनील लांजेककर, गिरीश सुरे, आकाश वाळकेकर, आकाश दिवाळे, कृष्णा जैस्वाल, संदीप बाईत, मनीषा सोनवणे आदी सद्गगुरु नगरमधील रहिवाशी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *