– मुलींच्या वैयक्तिक गटात एसआयएचे क्लीन स्वीप

भानुदास गायकवाड

डोंबिवली : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रगती महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व) यांच्या आयोजनाखाली आंतरमहाविद्यालयीन योगासना स्पर्धा प्रगती बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडली. ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या योगकौशल्याचे दमदार प्रदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन प्रगती महाविद्यालयाचे माजी खेळाडू तथा योग मार्गदर्शक प्रसाद मामूनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणे क्रीडा समितीचे सचिव गणेश मोरे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ. बागराव यांचा प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसाद मामूनकर यांनी सातत्य, चिकाटी आणि निश्चित ध्येय हे यशाचे गमक असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. वानखडे यांनीही विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धेच्या तांत्रिक बाजूची जबाबदारी मुख्य पंच राजेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे जिल्हा योग संघटनेच्या वतीने पार पाडली. डॉ. राहुल अकुल, उदय नाईक, गोपाळ सूर्यवंशी, डॉ. मनोज मकवाना, यतीन केणे, डॉ. बागराव, शिवराज सर, जयश्री मॅडम आणि पुष्कर पवार यांनीही स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्रसंचालन क्रीडा संचालक लक्ष्मण इंगळे यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

मुलांचा सांघिक गट

एस.एस.टी. महाविद्यालय, उल्हासनगर

बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली

मुलींचा सांघिक गट

एस.आय.ए. महाविद्यालय, डोंबिवली

बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली

मुलींच्या वैयक्तिक गटात एस.आय.ए.चा क्लीन स्वीप!

सानिका गायकर

साक्षी अवारे

सदासुखी मकाड

मुलांच्या वैयक्तिक गटात एस.एस.टी.चे वर्चस्व!

निबोध पाटील

पार्थ कदम

विकास तरे

मुलींच्या वैयक्तिक गटातील तिन्ही क्रमांक पटकावत एस.आय.ए. महाविद्यालयाने आपला दबदबा सिद्ध केला, तर मुलांच्या वैयक्तिक गटातील तिन्ही पदके पटकावत एस.एस.टी. महाविद्यालयाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. विजेत्या खेळाडू आणि संघांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *