कल्याण :  श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या  डायमंडच्या राजाचे आगमन पाहण्यासाठी आणि बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी डोंबिवलीकर, गणेश भक्त आणि वारकरी आतुरतेने वाट बघत असतात. याच डायमंडच्या राजाचे पारंपारिक पद्धतीने आगमन सोहळा रविवारी पार पडला. या आगमन सोहळ्याचे विशिष्ट आकर्षण होते ते वारकरी. वारकर्यांनी टाळ मृदंग आणि हरिनामाचा गजर करत आगमन सोहळ्यात सहभागी झाले. डोंबिवली मधील कावेरी चौकात या बाप्पाचे आगमन पाहण्यासाठी नागरिक, भाविकांनी आणि वारकरी यांनी मोठी गर्दी केली होती.
मंडळाचे अध्यक्ष मयूर पाटील यांनी सांगितले की मंडळाकडून दरवर्षी आगमन सोहळ्यात विशेष उपक्रम राबविले जातात. तर यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नाट्य स्वरूपात भेट दाखवण्यात आली. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली. तसेच आमचे मंडळ सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित असतात, असे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *