– उपनगर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
मुंबई : उपनगर जिल्हास्तरीय बॅडमिंटन सामने गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे २ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान संपन्न झाले. त्यामध्ये सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीच्या (SKBA) खेळाडूंनी ११ सुवर्ण आणि ८ रौप्य मिळून एकूण १९ पदके मिळविली !! मुंबई महानगरपालिकेच्या “शहाजीराजे क्रीडा संकुलात” मंगळवार ते शनिवार दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळात सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमी मध्ये विविध वयोगटातील मुलामुलींना बॅडमिंटनचे प्रशिक्षण दिले जाते.
खेळाडूंनी मिळविलेली पदके खालीलप्रमाणे:
(1) सोहम फाटक :- पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी तिन्ही गटात मध्ये सुवर्ण पदक (2) मानसी कारेकर :- महिला दुहेरी व मिश्र दुहेरी मध्ये
सुवर्ण पदक (3) प्रथीम मणीहर :- 17 वर्षा खालील एकेरी व दुहेरीत मध्ये सुवर्णपदक (4) रिषभ गजवाणी 19 वर्षाखालील दुहेरी मध्ये सुवर्ण पदक व एकेरी मध्ये रौप्यपदक. (5)एक सुवर्ण एक रौप्य (6) अनिका तनेजा :- 17 वर्षी खालील दुहेरी मध्ये सुवर्ण पदक (7)प्रीत कौर:- 70+ मिश्र दुहेरी मध्ये सुवर्ण पदक (8)
सुश्रुत करमरकर :- पुरुष दुहेरी मध्ये सुवर्ण पदक (9) श्वेता ठाकूर:- महिला दुहेरी, 70+ मिश्र दुहेरी व 80+ मिश्र दुहेरी तिन्ही गटात रौप्य मुकुट पदक (10)नमिता मेहता:- महिला दुहेरी मध्ये रौप्य पदक p(11)अयान कुलकर्णी:- 19 वर्षा खालील दुहेरी मध्ये रौप्य पदक (12) मायरा गरोदीया :- 13 वर्षा खालील एकेरीत रौप्य पदक (13)अद्रित सिंग :- 17 वर्षा खालील एकेरी मध्ये रौप्य पदक
अशी एकूण 11 सुवर्ण पदके व 8 रौप्यपदके. “सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीने मिळवली आहेत”” तो स्वतः राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचे खूप कौतुक होत आहे.
