मुंबई / रमेश औताडे

तुरुंगात शिक्षा भोगून आलेली व्यक्ती मला मारहाण करत असेल,  माझ्या शेतातील झाडे तोडत असेल तर पोलिस त्याला अटक का करत नाहीत ? असा सवाल करत तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील घोटवी गावच्या शोभा भाऊसाहेब खेंडकर यांनी  पोलीस अधिक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे १७ सप्टेंबर २०२६ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्या व्यक्तीचे नाव जग्या गुरफ्या काले असे नमूद केले असून हा सराईत गुन्हेगार गेली अनेक वर्षे मारहाण, शिवीगाळ, धमक्या देत असल्याने त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला दिलेली शिक्षा त्याने कारागृहात जाऊन भोगलेली आहे.

माझ्यावर अन्याय होत असताना पोलीस मात्र एनसी शिवाय कोणतीही दखल घेत नाहीत. त्याच्यावर  ठोस कारवाई व गुन्हा दाखल होऊन त्यास अटक होईपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही असे निवेदन शोभा खेंडकर यांनी पोलिसांना दिले आहे. या गुंडाने माझ्या शेतातील ७० आंब्याची झाडे कापून टाकली, पोलीस व वनखात्याला लेखी कळवूनही  स्थळपाहणी, पंचनामाही करण्यात आला नाही. माझी मुले नोकरी निमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे आता मला न्याय मिळावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *