वडील अनंत राऊत यांचे निधन
ठाणे : ठाणे – मुंबईत झी २४ तासमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार कपिल राऊत यांना पितृशोक झाला. कपील याचे वडील अनंत राऊत यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे.
ठाणे पुर्वेकडील कोपरी परिसरात राहणारे अनंत राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासुन खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निरंजन डावखरे,माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण आदिसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तसेच अनेक पत्रकार मित्रांनी उपस्थित राहून पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अत्यंत मीतभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे अनंत राऊत यांच्या जाण्याने कोपरी भागात हळहळ व्यक्त होत आहे.
00000
