अशोक गायकवाड
रायगड :अभ्यासू वृत्ती, चिकित्सकपणा ‘ज्ञान’ संपादन करण्यांची’ जिज्ञासा ‘खडतर मेहनत प्रचंड वाचन हे गुण खूपच आवश्यक असताना हे सर्व गुण प्रज्ञामध्ये आई-वडीलाकडून उपजत लाभल्याने तिच्या कडून अशा नवनव्या पुस्तकांचे लिखाण होत राहायला हवे. जेणे करून यातूनच भावी पिढीला देखील लेख लिहिणे, लेखक होण्यासाठी प्रज्ञाकडून प्रेरणा मिळेल, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार कुमार केतकर यांनी काढले.*
नागोठण्याची कन्या प्रज्ञा राजेश पोवळे हिने खासदार संसदरत्न, डॉ. अमोल कोल्हे यांनी देशाच्या संसदेत केलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषणांचा उत्कृष्ट असे अनुवाद व लेखन केलेल्या शिवनेरीचा छावा या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा गुरुवार, ५ जुलै रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात ज्येष्ठ पत्रकार, मा. खासदार, माजी संपादक, राजकीय विश्लेषक कुमार केतकर यांच्या हस्ते पार पडला. या निमित्ताने लेखिका प्रज्ञा पोवळे हीचा कुमार केतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खा- डॉ. अमोल कोल्हे, निर्भय बनो आंदोलनचे अॅड. असीम सरोदे, सकाळ प्रकाशनचे कार्यकारी संपादक सम्राट फडणीस यांच्यासह मांन्यवर उपस्थित होते. सकाळ प्रकाशनने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संसदेतील भाषणावरील शिवनेरीचा छावा हे पुस्तक प्रकाशित केले असून पुस्तकाची लेखिका प्रज्ञा ही दैनिक सामनाचे मुख्य वृत्त संपादक राजेश पोवळे यांची कन्या असून ती एबीपी माझा मध्ये निवेदिका म्हणून गौरवास्पद व उत्कृष्ट काम करीत असताना स्वतःची लिखानशैली तीन जोपासली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली अभ्यासू वृत्ती, चिकित्सकपणा ‘ज्ञान’ संपादन करण्यांची’ जिज्ञासा ‘खडतर मेहनत प्रचंड वाचन हे गुण खूपच अवश्यक असताना हे सर्व गुण प्रज्ञामध्ये आई-वडीलाकडून उपजत लाभल्याने तिच्या कडून अशा नवनव्या पुस्तकांचे लिखाण होत राहायला हवे. जेणे करून यातूनच भावी पिढीला देखील लेख लिहिणे, लेखक होण्यासाठी प्रज्ञाकडून प्रेरणा मिळेल. लेखिका प्रज्ञा पोवळे हिचे विविध स्थरांवरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
00000
