नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकमांविरोधात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
ए विभाग बेलापूर कार्यालयांतर्गत प्लॉट नंबर 62,63 व 64 सेक्टर 15 ,सन सिटी बंगला येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे पहिल्या मजल्यावर व दुसऱ्या मजल्यावर पत्राशेड उभारून जागा बंदिस्त करण्यात आले होते .
सदर बांधकामास नवी मुंबई बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानुसार संबंधितांनी केलेले बांधकाम स्वतः हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम तसेच ठेवले होते.
सदर बांधकाम सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करून सदरचे पत्रा शेड हटविण्यात आले.
त्याचप्रमाणे तसेच सी विभाग कार्यक्षेत्रात हॉटेल गोल्डन सूट व हॉटेल त्रेनजा सेक्टर 17 वाशी येथे महानगरपलिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे लॉजिंग हॉटेल व स्पा तयार केले होते.
सदर बांधकामास वाशी विभाग कार्यालयाने महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस देण्यात आली होती.संबंधितांनी केलेले बांधकाम स्वतः हून हटविणे आवश्यक होते. परंतु सदर बांधकाम स्वतः हून न हटविल्याने वाशी विभाग कार्यालयाने तोडक मोहिमेचे आयोजन करून सदर बांधकाम अंशतः निष्कासित करण्यात आले.
बेलापूर मोहिमेसाठी बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल, कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार इ. अधिकारी व कर्मचारी, वाशी विभागासाठी सहाय्यक आयुक्त श्री.सागर मोरे, अतिक्रमण विभागाचे पोलिस पथक तैनात होते. यापुढे देखील अशीच कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.