मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चक्क मुख्यमंत्र्यांनाच बगल देणाऱ्या राष्ट्रवादीच्या जाहीरातीमुळे दादा आणि भाईंचे (एकनाथ शिंदे) नेते आणि कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्याय नेत्यांनीही याबाबत जोरदार आक्षेप नोंदवूनही अजित दादांची राष्ट्रवादी त्यांना हवे तेच करीत होते. यावर आत मुख्यमंत्र शिंदे यांनीच दादांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या वर्षा बंगल्यावर  योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब केला आहे.  त्यामुळे महायुतीत लाडकी बहीण योजनेवरुन नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत येऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  महायुतीतील अंतर्गत वाद समोर यायला नकोत, असे खडसावले असताना अवघ्या दोन तासातच अजित पवारांचा फोटो गायब असल्याची  माहिती समोर आली आहे.  या योजनांच्या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  मुख्यामंत्र्याचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंचा फोटो आहे.

  अजित पवार यांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे यांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहेत. महाराष्ट्रातील देखाव्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो आहे. उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या पोस्टरवर आहे.  ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्रच्या  नकाशातून देखील अजित पवारांचा फोटो  गायब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *