अनिल ठाणेकर

ठाणे : नरेंद्र मोदी यांनी १ कोटी महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण दिल्याने ते हवेत ड्रोन उडवतात, शेतीमध्ये फवारणी करतात. महिलांना शक्ती देणारे मोदी सरकार आहे तर महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात तीन लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे, असे उद्गार राज्याचे शिक्षण मंत्री व शिवसेना मुख्य प्रवक्ते ना. दीपक केसरकर यांनी काढले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप,  राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले) व मित्रपक्ष या महायुतीतील पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना. दीपक केसरकर हे बोलत होते.

आपल्या समोरच सगळे इच्छुक उमेदवार बसलेले आहेत. यांच्यापैकी एक उमेदवार निवडून येणार. परंतु तो रेकॉर्ड ब्रेक मतदानाने निवडून येणार एवढे मी आपल्याला खात्री देतो. यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. ज्या मोदींनी भारताला स्वाभिमान दिला, मेक इन इंडियाचा मंत्र दिला. १ कोटी महिला ड्रोन प्रशिक्षण दिल्याने ते हवेत ड्रोन उडवतात, शेती मध्ये फवारणी करतात. महिलांना शक्ती देणारे मोदी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकार १२ हजार रुपये भरते. महिलांनी वस्तुंची निर्मिती करावी म्हणून बचत गटांचा रिव्हाॅलविंग फंड दुप्पट केला आहे. बचत गटाला मदत करणाऱ्या मत्य दिदींचे, कृषी दिदींचे मानधन दुप्पट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. गाडीतून जाताना एखादा वृद्ध गृहस्थाला पोलिसांनी अडवले असेल तर गाडी थांबवून ते पोलीसांना प्रथम त्या वृद्ध गृहस्थांना पलिकडे नेऊन सोडायला सांगतात. शेवटचा मनुष्य भेटल्याशिवाय ते झोपायला जात नाही. रात्री तीन वाजता झोपतात आणि सकाळी परत येऊन महाराष्ट्राचा कारभार बघतात. मुख्यमंत्री हा जनतेचा मुख्यमंत्री असतो, गोरगरिबांचे दुख समजणारा मुख्यमंत्री असतो. बाळासाहेब दवाखान्यात सर्वांना मोफत उपचार, औषधोपचार मोफत, समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड हे सुविधा महायुती सरकारने केल्या. नवीन बोगद्यामुळे घोडबंदरचा वाहतूक कोंडी दूर होऊन ठाण्यावरुन बोरीवली येथे १५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र हा आघाडीवर आहे. कर्नाटकात ४० हजार कोटींची गुंतवणूक तर महाराष्ट्रात तीन लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.मतदानातुन विकास पाहिजे हे दाखवून द्या, आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशभरातून ४०० पार खासदार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातुन ४५ प्लस खासदार निवडून आणण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वचन दिले आहे. ते वचन पूर्ण करण्यासाठी निवडणूकीची लढाई जिंकून दाखवूया.असे आवाहन दिपक केसरकर यांनी केले.

यावेळी ड्युप्लीकेट नरेंद्र मोदी उर्फ विकास महंते, शिवसेना युवा नेते राहुल लोंढे, राष्ट्रवादी ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रिपाइं(आ) जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, शिवसेना माजी आमदार रविंद्र फाटक,  रिपाइं नेते सुरेश बारशिंगे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजप आमदार संजय केळकर आदी मान्यवरांनी संबोधित केले. तर भाजप नेते संजीव नाईक, संदीप लेले, आशुतोष डुंबरे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या परिषा सरनाईक आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *