काहीतरी नवीन…
श्याम तारे
येत्या बुधवारी चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण जरी भारतातून दिसणार नसले तरी या निमित्ताने आपण आपल्या चंद्र विषयक माहितीची उजळणी करू या आणि त्यात काही नवीन माहितीची भर घालू या…चंद्रग्रहण पौर्णिमेलाच होत असते आणि यावेळी खग्रास चंद्रग्रहण असेल तर चंद्राची अप्रकाशित बाजू आपल्याकडे असल्यामुळे अशा ग्रहणाच्या काळात चंद्र आपल्याला दिसणार नाही.
तर चंद्राच्या नावांची सुरुवात संस्कृत भाषेपासून करू या. इंदू, कुमुदबांधव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकांत, शशांक, शशिन्, सुधांशु या सोबतच सोम या नावानेही चंद्र ओळखला जातो. काही असे उल्लेख मिळतात ज्यात चंद्राची १११ नावे असून त्यांचे पठण शुभ असल्याचे म्हटले आहे.
पौराणिक माहितीकडून आधुनिक विज्ञानाकडे वळलो तर चंद्राबद्दल आपल्याला अलीकडे वारंवार ऐकू येणारा ‘सुपरमून’ हा खास शब्द लक्षात येतो. चंद्राच्या लांबलचक नामावलीतील ‘सुपरमून’ हा शब्द खगोल वैज्ञानिक रिचर्ड नोल्ले यांनी १९७९ मध्ये तयार केला. ‘सुपरमून’ हा पौर्णिमेचा अथवा प्रतिपदेचा चंद्र असतो. यावेळी चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीपासून ९० टक्के जवळ आलेला असतो. साधारणपणे चंद्र आपल्या दूरच्या कक्षेपेक्षा १२ टक्के म्हणजे ४३ हजार किलोमीटर्स जवळ असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी तो २५ टक्के अधिक प्रकाशमान झालेला असतो.
चंद्र पृथ्वीचा भाऊ मानला गेला आहे. भारतीय गणनेनुसार चंद्राच्या कला असतात. त्याचे येणे प्रतिपदेपासून चतुर्दशी पर्यंत (दिसणे) आणि अमावास्या (अदृश्य होणे) असा हा प्रवास कालातीत असा सातत्याने सुरु असतो. चंद्राला असलेली नावे त्याच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या कलांचा उल्लेख करताना आढळतात. हिलो चंद्र, होयका चंद्र, ओलेकलुआ चंद्र, ओलेकुकाही चंद्र, कुपाऊ चंद्र, दुपारी येणाऱ्या ओहोटीचा कुक्कोलू चंद्र, कुलुआ चंद्र अशी नावे बघायला मिळतात. यापैकी प्रत्येक चंद्र हा कवितेमधला चंदेरी चांदोबा तर असतोच पण त्यासोबतच तो सर्वाना खुश करतो हेही खरेच! ब्रिटनमध्ये मे महिन्यातील पहिल्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘फुलांचा चंद्र’ असे नाव असते.
जेव्ह्रा चंद्राची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ असते तेव्हा त्या बिंदूला ‘पेरिजी सायझिगी’ असे वैज्ञानिक नाव आहे. सुपरमून हाच असतो आणि तो वर्षातून तीन किंवा चार वेळी असतो. केवळ चंद्र मोठ्या आकारात दिसणे हेच या चंद्राचे वैशिष्ट्य असते. चंद्राची कक्षा पृथ्वीध्या सर्वाधिक जवळ असते तेव्हा त्या बिंदूला ‘पेरिजी सायझिनी’ असे वैज्ञानिक नाव आहे. यावेळी जो पौर्णिमेचा चंद्र असतो त्यालाच सुपरमून म्हंतात आणि हा वर्षातून तीन किंवा चार वेळी असतो. केवळ मोठ्या आकारात दिसणे हेच या चंद्राचे वैशिष्ट्य असते.
चंद्र हा देवतेचे रूप मानला जातो. काही भाषांमध्ये चंद्राची आणखीही काही नावे आढळतात. या अनेक नावांपैकी काहीची भारतातही तुम्हाला नावाने ओळख पटेल, लूना, तुंगी, कू, हली, कॅप, योरेह, मान, म्वेझी, बुलान, मारामा, अय इत्यादी…लूना ही एक चंद्रदेवता मानली जाते.
‘ब्लड मून’ हा संपूर्णपणे लाल रंगाचा चंद्र एका चंद्रग्रहणाच्या काळात मोरोक्कोमधील रबात येथी दिसला होता. एका चंद्र असतो ‘हंगामाचा’ तर एक असतो ‘बीव्हर’ या प्राण्याचा, एक चंद्र ‘मक्याचा’ असतो तर आणखी एक चंद्र बार्लीचा असतो. धान्याचा आणि फळांचा देखील चंद्र असतो. आपल्या ओळखीचा सशाचा चंद्र तर विसरता येणार नाही. कठीण काळाचा चंद्र असतो आणि छोट्या तसेच मोठ्या दुष्काळांचेही चंद्र असतात. कृश (हाडकुळा) चंद्र असतो. भुकेलेला चंद्र असतो आणि मृत्यूपंथाला लागलेला चंद्रही असतो. दिनदर्शिकेच्या एकाच महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘निळा’ चंद्र असे नाव आहे तर अशा एक महिन्यातली दुसरी प्रतिपदा असेल त्या दिवशीच्या चंद्राला ‘काळा चंद्र’ असे नाव आहे.
अर्थात ही सगळी नावे वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचलित आहेत आणि त्यांच्या अनेक कथाही असू शकतात. परंतु शांत आणि सुंदर असा चंदेरी प्रकाश देणारा कुणीतरी आपल्या पृथ्वीभोवती सातत्याने फिरतो आहे आणि आपल्याला आनंदाचे दान देतो आहे हे किती छान…
प्रसन्न फीचर्स
