मुंबई : मुंबई कोस्टल रोडला आता वरळी ते वांद्रे सी-लिंकला जोडण्यात आले आहे. त्यामुळे नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या १० मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. मुंबईच्या कोस्टल रोड ते वरळी – वांद्रे सागरी सेतूशी जोडणाऱ्या पूलाचा टप्पा उद्या शुक्रवार सकाळपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वांद्र्याहून नरीमन पाँईटच्या दिशेने जाणारा रस्ताही लवकरच खुला होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यि हस्ते या नव्या टप्प्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोस्टल रोडचा पहिला टप्पा या वर्षी मार्चमध्ये खुला करण्यात आला होता. कोस्टल रोडच्या उत्तर वाहीनीला पूर्वी सोमवार ते शुक्रवार प्रवासास मुभा होती. आता मात्र गणेशोत्सवात ही मार्गिका शनिवार आणि रविवारी देखील सुरु ठेवण्यात आली आहे. त्यातच कोस्टल रोडवरुन वांद्रेयेथे जाणाऱ्यांना आता कोस्टल रोडला थेट वांद्रे ते वरळी सी-लिंकला जोडल्याने दक्षिण मुंबई ते वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास होणार आहे. त्यामुळे मुंबईकर वाहनचालकांना आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता अवघ्या 10 ते 12 मिनिटांत गाठता येणार आहे.शिवाय पुढे वांद्रे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे विमानतळावर अवघ्या 18 मिनिटांत पोहोचता येणार आहे. दक्षिण मुंबईहून विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर अवघ्या 30 मिनिटांत मुंबईकरांना पोहता येणार आहेत.पुर्वी या प्रवासाला दोन तास लागायचे, मात्र आत्ता इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे…
