आमच्या लहानपणी असा आजकाल बरेचदा उल्लेख केला जातो. त्याचा अर्थ इतकाच की गेल्या पन्नास साठ वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्यांची यादी खूप मोठी होईल पण काही बाबतीत पूर्वी जे घरगुती नियम होते ते आज विज्ञानानेही ते काही प्रामाणात योग्य आहे याचा अर्थ इतकाच की पूर्वी देखील आपल्या घरातील नियमांमध्ये विज्ञान असायचे.
त्यावेळी मुले काही खायला बसली आणि त्यांच्यापैकी कुणाच्याही हातून एखादी चपाती खाली पडली तर आई लगेच ती चापटी खायला नाही म्हणत असे. काही वेळा तिचे हे सांगणे समजायला अवघड होते. छाती काय किंवा बिस्कीट काय ते खाली पडल्यानंतर खाऊ नये असे सांगितले जात असले तरी काही वेळी आईचे लक्ष असेल तर ती म्हणायची “उचलून घे’. असे का हेही त्यावेळी समजायचे नाहीच. तर यात सामान्य माहिती अशी होती की कोणताही खाण्याचा पदार्थ खाली जमिनीवर पडला आणि तो जर पाच सेकंदांच्या आत उचलला गेला तर तो खायला सुरक्षित असतो. यातला अनुभाव असा असे की जमिनीवर अनेक प्रकारचे कीटाणू असतात आणि त्यांचा संपर्क पदार्थाशी आला तर आरोग्याला धोका होऊ शकतो. पण कीटाणू सणाच्या संपर्कात येईतोवर काही ठराविक वेळ लागतो. त्यासाठी आईचे हे बोल असायचे.
इसवी सन २०१३ मध्ये शिकागो शेती विज्ञान शाळेच्या संशोधक महिला जिलीयन क्लार्क यांनाही हाच प्रश्न पडला आणि त्यांनी या विषयावर चाचण्या घेऊन या नियमाची सत्यता शोधून बघायचे ठरवले. त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फरशांवर काही बिस्किटे टाकली आणि पाच सेकंदांपर्यंत ती तशीच पडू दिली. त्याना असे दिसले की जीवाणूंनी बिस्किटांना खूप लवकर म्हणजे पाच सेकंदात तावडीत घेतले होते.
आणखी एकच वर्ष मध्ये गेले. दक्षिण कॅरोलिना विद्यापीठाचे संशोधक पौल डॉसन यांनीही पाच सेकंदांच्या नियमावर संशोधन केले आणि आपले निष्कर्ष उपयोजित सूक्ष्म्जीवशास्त्र या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध केले. ते म्हणाले की पाच सेकंदांचा असा काही नियम असू शकत नाही आणि हे तर वेडेपणाचे बोल आहेत. याच विषयावर संशोधन करणारे ब्रिटन मधील सूक्ष्मजीव्शास्त्र विषयाचे प्राध्यापक अँठ्नी हिल्टन यांनी या वादाला पुन्हा सुरुवात केली. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की जितका अधिक वेळा पदार्थ फरशीवर पडून राहील तितका त्याला कीटाणूंचा संसर्ग होण्याची भीती अधिक होती. याला त्यनी पाच सेकंदाचा नियम म्हणून मान्य करावे असे प्रतिपादन केले.
संशोधक इतक्यावर कधीच समाधान मानीत नाहीत. त्यामुळे अमेरिकेतील न्यू जर्सी विद्यापीठाचे प्राध्यापक डोनाल्ड शाफनर यांच्या रॉबिन मिरांडा या विद्यार्थाने टरबूज, ब्रेड, लोणी लावलेली ब्रेड आणि चॉकलेट असे चार वेगवेगळे पदार्थ घेतले आणि ते स्टेनलेस स्टील, सेरामिक, लाकूड आणि आणि जमीन अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या फरशांवर टाकले या फरशांवर काही कीटाणूंचा वावर सुरु केला गेला. त्यांचा अन्नाशी संपर्क किती काळ झाला हे नोंदवले गेले. हे संशोधन अधिक परिपूर्ण होते आणि तरीही त्यात देखील काही बाबतीत तर १ सेकंदापेक्षाही कमी वेळात जीवाणूनी पदार्थावर आक्रमण केले होते.
आपल्या घरातील इतर खोल्यांपेक्षा स्वयंपाकाच्या खोलीत अधिक जाणे येणे होत असते आणि त्यातून संसर्गाची भीती वाढत जाते. येथेच अन्न पदार्थांचे काही छोटे कण देखील पडलेले असू शकतात. त्यामुळे आहार घेण्यासाठी आपण जमीन किंवा टेबल यापेकी कशाचाही उपयोग करीत असले तरी पाच सेकंदाचा नियं पाला जावा…मुलांनाही समजावून सांगावा…
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *