ठाणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने रामचंद्र नगर परिसरातील जनतेसाठी नागरी सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचा शुभारंभ आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शिबिराच्या मुख्य संयोजिका ठाणे शहर भाजपच्या सरचिटणीस डॉ समीरा भारती म्हणाल्या, केंद्र शासनाने नागरिकांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार जनतेच्या दारात जाऊन त्यांना नागरी सुविधा देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नविन मतदार नोंदणी, मतदार कार्डात पत्ता बदल, नविन आधारकार्ड किंवा त्यात काही बदल असतील ते, पोस्ट खात्याचा अवघ्या ५४९ रुपयांचा १० लाख रुपयांचा अपघात विमा, जेष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास दाखला-डोमीसाईल सर्टिफिकेट नागरिकांना करुन घेता येणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा नागरिकांनी अवश्य फायदा घ्यावा. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी भाजप ठाणे शहर चिटणीस ऍड तृप्ती जोशी, लोकमान्य-सावरकर नगर मंडळ अध्यक्ष निलेश पाटील, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पडवळ विशेष परिश्रम घेत आहेत.यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
