शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात
आज सुप्रीम सुनावणी
नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुरु होणार आहे. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणीही यावेळी होणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हा अजित पवारांचा असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्चन्यायालयात धाव घेतली होती. राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्यास विविध प्रश्न उपस्थित राहतील. किंवा शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आल्यास उद्धव ठाकरेंसारके एकनाथ शिंदे यांनाही तात्पुरते नवे चिन्ह आणि नाव देण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, उद्या सुप्रीम कोर्टात बुधवारी ३७ नंबरचे मॅटर सुनावणीसाठी येणे अवघड असल्याची शंका अडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली. आपल्या व्टिटमध्ये सरोदे लिहीतात ‘आता लोकांचा नवीन प्रश्न- जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील.सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल…असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.”
