गुवाहाटी : सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन इनिंगच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी२० क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडचा १० ओव्हर आणि ८ विकेट राखून धुव्वा उडविला आणि टी२० मालिकाही जिंकली.

 न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५३ धावा केल्या होत्या.कॅप्टन सूर्यकुमार यादवनं २६ बॉलमध्ये  ५७ धावां ठोकत सलग दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं  यानं २० बॉलमध्ये ६८ धावांची अर्धशतकी खेळी करीत त्याला सुरेख साथ दिली. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं या विजयासह वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *