मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं बारामतीत झालेल्या विमान अपघातामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्वता खुलासा केला आहे.
अजित दादांनी अर्थसंकल्पा संदर्भात भरपूर तयारी केली होती. उद्यापासून मी लक्ष घालून ज्या काही प्रोसेस आहेत, त्या पूर्ण करणार आहे. आम्ही त्यानंतर एकत्रपणे ठरवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना अजित पवारांनी या खात्याला शिस्त लावली होती. पण आता त्यांच्या निधनानंतर
फडणवीस अर्थखात्यासारक्या संवेदनशिल खाते स्वता हाताळतील अशी अटकळ होती. आज त्यांनी तसे संकेत दिले आहेत.
