क्रिकेट गुणलेखक बळवंत सकपाळ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
ठाणे:  फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ क्रिकेट गुणलेखक आणि कचराळी तलाव मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे संस्थापक बळवंत विठ्ठल सकपाळ यांना नुकतेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रास्ताविकात आनंद टंगसाळी म्हणाले, बळवंत सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आमचा ग्रुप दरवर्षी उरळीकांचन, कुशावर्त प्रदक्षिणा करायचा. तर चार वर्षातून एकदा होणारी आमची हिमालय भ्रमंती आजही सुरु आहे. फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे हरेश्र्वर मोरेकर म्हणाले, क्लबच्या वार्षिक मैत्री दिन साजरा करताना बळवंत सकपाळ यांचा उत्साह, आयोजन, नियोजन आदर्शवत होते. ते भविष्याचा वेध घेणारे  इष्टे होते.  कचराळी तलावाभोवती वॉक करण्याच्या आठवणींना आनंद शेणोलीकर यांनी उजाळा दिला. तर आपल्या सर्वांगीण प्रगतीत  बाबा माझे हिरो होते अशी भावना सकपाळ यांची ज्येष्ठ कन्या अश्विनी कदम यांनी व्यक्त केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बळवंत सकपाळ सत्काराला उत्तर देऊ शकले नाहीत.यावेळी संजीवनी सकपाळ, भारती मोरेकर, निलम सकपाळ, हॉटेल शेल्टरचे शर्माजी, अनिरुद लिमये आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद नाखवा यांनी केले. सकपाळ यांचे चिरंजीव आलोक यांनी “ देणारे दुर्मिळ घेणारे पुष्कळ, तरी जपतात बाबा बळवंत, आनंद द्या आनंद घ्या चा वारसा, खरच हा मुलखावेगळा वसा, आपणा सर्वासाठी ठरावा आरसा, या चारोळीने कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *