उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद – विश्वनाथ पाटील
अविनाश उबाळे
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा झालेला विमान अपघातातील मृत्यू हा मला संशयास्पद वाटत आहे.या अपघाताची पारदर्शकपणे सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली आहे.तानसा,वैतरणा प्रकल्पग्रस्त समितीच्या कृतज्ञता सोहळ्यासाठी ते शहापूर तालुक्यातील तानसा येथे आले असताना ते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.यावेळी पाटील यांनी अजित पवार यांच्या मृत्यू बाबत दुःख व्यक्त करत त्यांच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त केला आहे.ते यावेळी म्हणाले की हा अपघात म्हणजे संशयास्पद असं मला वाटत असून अपघाताग्रत विमानात सापडलेल्या ब्लॅक बॉक्स मध्ये काहीतरी महत्त्वाची माहिती अथवा धागेदोरे तपास यंत्रणांना सापडू शकतात याकरीता अगदी गांभीर्याने या विमान अपघाताची सरकाने चौकशी करणे गरजेचे आहे.अशी मागणी पाटील यांनी केली. विश्वनाथ पाटील यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांचा विमान अपघाता की घातपात ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा,वैतरणा भुमिपुत्र प्रकल्प ग्रस्त समितीच्या वतीने मंगळवारी येथे एका कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.मुंबई महापालिकेत नोकरी मिळालेल्या ९५० प्रकल्प ग्रस्तांच्या वतीने कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांचा सपत्नीक जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई,शेतकऱ्यांचे प्रश्न,प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न,अजूनही सुटलेले नाहीत हे भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न कुणबी सेनेच्या माध्यमातून यापुढे सोडविण्यासाठी मी पुन्हा सरकार विरोधात प्रखरपणे आंदोलन करणार आहे.असे पाटील यांनी सांगितले शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सोडविण्यासाठी सरकार राबवत असलेली भावली पाणी पुरवठा योजना ही पुर्णतः बोगस ठरणार असून यात मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.ही योजना सपशेल अयशस्वी ठरली आहे या योजनेच्या चौकशी करण्यासाठी लवकरच एक आंदोलन मी छेडण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितले या सोहळ्यासाठी मुंबई महापालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता गुहे,अंकुश भोईर,तानाजी मोरे,मुन्सीपल बँकचे संचालक भानुदास भोईर,सावंत आदी मान्यवर उपस्थित होते हा कृतज्ञता सोहळा यशस्वी करण्यासाठी विकास गोदडे, योगेश निपुर्ते, दिनेश निमसे,सुदर्शन गोदडे, प्रदीप गायकवाड, महेश राणे, यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *