केडीएमसीत मालमत्ता कर व पाणीपटटीची अभय योजना विचाराधीन नाही
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांस मालमत्ता कराची देयके यापूर्वीच बजावण्यात आलेली आहेत. मालमत्ता कराच्या रक्कमा विहित मुदतीत महापालिकेत जमा करणे आवश्यक आहे, तसे न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची “ड”, प्रकरण-आठ” कर विषयक नियमातील नियम क्र. ४१” नुसार प्रतिमहा २ टक्के विलंब शुल्क आकारण्यात येत आहे.
नागरीकांना मालमत्ता कर भरण्याबाबत वारंवार आवाहन केलेले आहेत. महानगरपालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर कारवाई सुरुवात केली असून, स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करणे, कोणतीही पुर्वसूचना न देता नळ जोडणी खंडीत करण्यात येत आहे. तसेच, जप्त केलेल्या मालमत्तांचा जाहिर लिलावाने विक्री करण्याचा निर्णय प्रक्रियेत आहे. महानगरपालिकेमार्फत सन २०२३-२०२४ व सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात “अभय योजना राबविण्यात आली होती. याप्रमाणे, यावर्षीही महानगरपालिकेकडून अभय योजना राबविली जाईल असे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झालेले आहे.
तरी, सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता कर व पाणीपटटीची “अभय योजना” लागू करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन नाही. करदात्यांनी आपला संपूर्ण मालमता कर व पाणीपटटी भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे व दंडात्मक व कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *