साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण स्टेशन केडीएमटी बस सेवा सुरु
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बराच काळ बंद असलेली  मार्ग क्र.३ साई चौक-सह्याद्री नगर-कल्याण स्टेशन बससेवा परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गुरुवारपासून नागरिकांच्या सेवेत पुन्हा सुरू झाली आहे. आज गुरुवारी सकाळी खडकपाडा साई चौक येथे या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांच्याहस्ते नारळ फोडून या बसला भगवा झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख सुनील वायले, नगरसेवक किरण भांगले, रुपेश सकपाळ, नगरसेविका शालिनी वायले, प्रमिला पाटील, तनुजा वायले, युवासेना कल्याण उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील आदी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला, स्थानिक नागरिक, परिवहन सेवेचे अधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन हे अंतर ४ किलोमीटर असून या मार्गासाठी नागरिकांना २५ ते ३० रुपये भाडं रिक्षाला मोजावे लागत होते. मात्र आता केडीएमटीच्या बससेवेमुळे नागरिकांना अवघ्या १० रुपयांत स्टेशनपर्यंत जाता येणार आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार आणि शिवसेनेच्या पाठपुराव्याने हि बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून या बसचा मार्ग साई चौक-साईबाबा मंदिर-ब वार्ड-संघवी इस्टेट-इंदिरा बंगला-आरटीओ-सह्याद्री नगर-कोकण वसाहत-सह्याद्री नगर फाटा-बिर्ला कॉलेज-इंदिरा नगर-भवानी चौक,प्रेम ऑटो-पौर्णिमा चौक-सिंडिकेट-स्टेट बँक-बाईचा पुतळा-रामबाग-कल्याण स्टेशन या महत्त्वाच्या ठिकाणांमार्गे धावणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *