सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे – राजकुमार पातकर
कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव हि शिकवण कॉंग्रेस पक्ष पुढे नेत असल्याचे मत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी व्यक्त केले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’ तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यालयात करण्यात आले यावेळी पातकर बोलत होते.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांच्यासह राजेश वाघमारे, मामा पगारे, सलीम शेख, गोपाळ शर्मा, दशरथ पाटील, अरुण वायले, हाफिज कुरेशी, संकेत लोके, अमोल गायकवाड, शामराव यादव, सुजित सिंह, चंद्रकांत पगारे, हरिश्चंद्र पाटील, जयराज पवार, वैशाली वाघ, किशोर वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पातकर यांनी सांगितले कि, शिवाजी महाराज शौर्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी होत असते. वर्षाचे 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी कमी आहे कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. त्यांची जयंती साजरी करणे आपले आद्य कर्तव्य आहे. कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा सन्मान करून स्त्रियांचा आदर करण्याचे शिवाजी महाराजांनी शिकवले. काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराज यांची शिकवण पुढे नेत असल्याचे पातकर यांनी सांगितले.
