लेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” कथासंग्रहाला संभाजी महाराज साहित्य पुरस्कार!
मुंबई- ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्या ‘सावट’ या कोविड आधारित कथासंग्रहाला यावर्षीचा ऍग्रोन्यूज परिवार चेरिटेबल आयोजित मानाचा संभाजी महाराज साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सावट कथासंग्रह संपूर्णतः मानव संहारिक कोरोना काळातील घटनांवर आधारित आहे. मागील फेब्रुवारीला दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले होते. पुण्याच्या चपराक प्रकाशनने अतिशय सुबकरित्या हे पुस्तक प्रकाशित केले होते.कोरोना घटनांवर अत्यंत संवेदनशील मनाने लेखन केलेले हे एकमेव पुस्तक ठरले. त्यामुळेच हे पुस्तक सर्वत्र चर्चेत होते. लेखक काशिनाथ माटल यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. पुरस्कारवितरण सोहळा येत्या २७ फेब्रुवारीत रोजी ९व्या वर्षी होत आहे. या व्यतिरिक्त उत्कृष्ट कादंबरी,बालसाहित्य, काव्य,प्रवासवर्णन,संशोधन इत्यादी साहित्यात पुरस्कार जाहीर झाले आहेत.
