उपमुख्यमंत्र्यांचा ग्रामरोजगार सेवकांना दिलासा
रमेश औताडे
मुंबई: ग्रामपंचायत ग्रामरोजगारसेवक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अमोल वाकोडे व संदीप माने यांनी आझाद मैदानात जे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून लवकरच त्यांच्या मागण्या मान्य होतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याने राज्यातील ग्रामरोजगार सेवकांनी काही काळ या आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र सरकारने जर वेळ घेतला तर आंदोलन आक्रमक होईल असा इशारा दिला आहे.
