रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी नैसर्गिक रंगांसहीत सहकुटुंब धुळीवंदन करीत महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीचे रंग सदैव खुलत राहो अशा शुभेच्छा दिल्या…तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी अजित पवार तसेच पक्षातील अगदी जवळच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबात झालेल्या निधनामुळे यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. पण परंपरेप्रमाणे आनंदश्रमात धर्मवीर आनंद दिघें आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तस्बीरींना रंग लावून त्यांच्यां आठवणींना उजाळा दिला. तर तिसऱ्या चित्रात दुबईत अडकेलल्या पुण्याच्या इंदिरा बिझनेस स्कृलच्या विद्यार्थ्यांना स्पेशल विमानाने मुंबईत आणण्याची व्यवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरीलव भयमुक्ततेचा रंग….
