पंतप्रधान मोदींची फोन डिप्लोमसी
आखाती देशातील ८ नेत्यांना फोन
युद्धजन्य परिस्थितीबाबत व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्ष दिवसागणित अधिक चिघळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील ८ नेत्यांना फोन करून या संघर्षाबाबत चर्चा केली आणि भारताची भूमिका स्पष्ट केली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४८ तासांत ८ देशांच्या प्रमुखांची चर्चा केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. कतारवरील हल्ल्यांचा निषेध केला आणि कतारमधील भारतीय समुदायाला पाठिंबा आणि काळजी दिल्याबद्दल कतारच्या प्रमुखांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवैत आणि कतार या ८ देशांच्या प्रमुखांची संवाद साधला. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही काही देशातील समपदस्थांशी चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भारताने सर्व देशांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात, या प्रदेशातील परिस्थिती लक्षणीयरीत्या बिघडणे दुर्दैवी असल्याचे भारताने म्हटले आहे.
