महाराष्ट्रात चाललंय काय ?

झिरवळ हे वागणं बरं नव्हं

माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांचे सेक्सकांड

० सरकारी बंगल्यात तृतीयपंथीसोबत शय्यासोबत आणि दारूबाजी

० पवन यादव या तृतीयपंथीविरोधात त्याच्या भावानेच केला भांडाफोड

० भावकीच्या वादात झिरवळांची गोची ० वादग्रस्त व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात खळबळ

विशेष प्रतिनिधी

मुंबई भोंदूबाबा अशोक खरातच्या काळया कृत्याने अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच भोळाबाबड्या चेहऱ्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या सेक्सकांडाने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. पवन यादव या तृतीयपंथीयासोबत सरकारी बंगल्यात शय्यासोबत करतानाच दारूपार्टीही केल्याचा व्हिडीयो व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकाऱण्यांची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. पवनचा भाऊ रवी यादवने भावकीच्या वादातून झरहरी यांचा हा व्हिडीयो पत्रकार संघात व्हायरल केला आणि सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झालाय.

राज्याच्या राजकारणात माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून विविध राजकीय पक्षांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

व्हिडिओमधील दृश्ये आणि त्यातील आशयामुळे विरोधकांनी झिरवळ यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी नैतिकतेचे पालन करावे, असा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारेनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, यावर झिरवळ यांची प्रतिक्रीय आली नसली तरी झिरवळ समर्थकांनी हा व्हिडिओ “कट-छाट करून प्रसारित” करण्यात आल्याचा दावा करत त्यामागे राजकीय कटकारस्थान असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओची सत्यता आणि संदर्भ तपासल्याशिवाय निष्कर्ष काढू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नसून, पोलिसांकडून किंवा संबंधित यंत्रणांकडून याबाबत अधिकृत भूमिका येणे अपेक्षित आहे.

गेल्याच महिन्यात झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनात लाचखोरी करताना त्यांच्या कर्मचाराला पोलिसांनी रंगेहात पकडले होते.

पवन यादवने बलजितसिंग भाटीयाच्या मदतीने आपणाकडून २५ लाखाची खंडणी मागितली होती. ती न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात तुला अडकवीन अशी धमकी दिली होती. काही पोलिस अधिकारीही त्यात सामिल होते असा आरोप रवि यादवने केला आहे. पवन यादवचे चारित्र काय आहे हे जनतेसमोर यावे यासाठीच हा व्हिडीयो त्याने पत्रकार परिषद घेऊन उपस्थित पत्रकारांना दिला. पण हा व्हिडीयो व्हायरल झाल्यामुळे झिरवळांचे आता वांदे झाले असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

photo caption

पवन यादवचे कारनामे पत्रका परिषदेत उघड करताना रवी यादव

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून

हटवण्यासाठी खरातची अघोरी पूजा

स्लग- जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा 

३८ आमदारांनी अघोरी पुजेसाठी अनामिका कापल्या

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी भोंदू बाबा अशोक खरात यांने अघोरी पुजा केली होती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासाठी अशोक खरातकडे राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरात यानेही या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक स्फोटक दावे केले.

अशोक खरातने २००७ साली सर्वात आधी पत्रकार बाळू तुपे याचा बळी दिल्याचा खळबळजनक दावाही केला. त्यावेळी अनेक वर्तमानपत्रांनी याबाबत खरातचा पर्दापाश करणारी मालिका चालवली होती. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, मी खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नाव उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हणाला होता, ‘मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील.’

अशाप्रकारच्या काळ्या जादूला आपण राज्यमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, ईशान्येश्वर मंदिरासाठी कमानी बांधल्या, टाक्या बांधल्या, हा अशोक खरात इतका मोठा कोण होता? मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे समस्त आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे ३८ आमदारांची लिस्ट आहे, त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या बाबासाठी सरकाराचा पैसा जातोय, रस्ते बनवले जात आहेत. शिक्षण खाते, म्हाडा, एसआरए सगळ्या पोस्टिंग खरातकडून केल्या जात आहेत. हे काय सुरु आहे? अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्य असणाऱ्यांना अजून अटक का झाली नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *