रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’
राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच लिहीले होते पत्र
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच पत्र लिहीले होते असा खळबळजनक आरोप रोहीत पवार यांनी पुराव्यासहीत केला आहे.
अजित पवारांचे २८ जानेवारी २०२६ ला झालेल्या निधनानंतर अवघ्या १८ व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार ‘कार्याध्यक्षांना’ (प्रफुल पटेल) देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली आहे.
काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्रे समोर आली. हा कागद १०. ०३. २०२५ चा आहे, यामध्ये सुनेत्राकाकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात २८ जानेवारी २०२५ ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला जाईल तो ग्राह्य धरू नये. २६ फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाचे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल पटेल तटकरे यांच्या आहेत, ज्यामध्ये लिहिलं होत कि, आमचा पक्षाचा कॉस्टिट्युशन बदलला आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नेशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे ताकद असेल असा या पत्रात म्हटलं गेलं होतं, सर्व निर्णय हे ते घेतील असा या पत्रात म्हटलंय. कोण होतं नेशनल वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल पटेल होते. यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिंडेन्ट यांच्याकडे असावे असा या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळल्यावर सुनेत्रा काकींनी आयोगाला पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होपर्यत कोणताही पत्र विचारात घेऊ नये, असंही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचे दिलेले विधान आणि त्यानंतर त्यांनी ते ‘चुकीने बोललो’ असे सांगणे, या घटनाक्रम संशयास्पद वाटतो, असे ते म्हणाले. पण आधीच नेत्यामध्ये ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती. सुनेत्रा काकींना सांगायचं आहे, राजकारण लय वगाळ झालं आहे, सुनील तटकरे प्रफुल पटेल यांनी सांगितलं होत की, अधिवेशनात कोणीही अजित पवार यांच्या अपघातबद्दल बोलायचं नाही, म्हणून काही आमदार सोडले तर कोणीही सभागृहात याबद्दल बोलत नव्हते. जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते त्याचा काय झालं. त्याने पण पत्रकार परिषद घेतली नाही असेही रोहीत पवार यावेळी म्हणाले.
