अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आश्वासन
कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांची मनमानी आणि दादागिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्टँडच्या आजूबाजूला येणारे दुचाकी चालक आणि खासगी वाहनातून येणाऱ्या प्रवाशासबोत स्टँन्डमधील रिक्क्षा चालक गैरवर्तन करतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक रात्रीच्या वेळी स्काय वाँक वरून येणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबातील सदस्य त्यांना घेण्यासाठी रिक्क्षा स्टँन्ड परिसरात आपल्या वाहनासह थांबतात. रिक्षाचालक तेथे वाहने उभी करण्यास नकार देतात. रिक्षा स्टँडला आपली मालमत्ता समजून रिक्षाचालक सामान्य नागरिकांना तेथे वाहनासह थांबण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी रात्री येथील एका स्थानिक नागरिकाशी रिक्क्षा चालकांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे.
शरद शिंदे नावाचा व्यक्ती आपल्या मुलीला घेण्यासाठी स्कायवॉकजवळ पोहोचला असता, काही रिक्षाचालकांनी त्यांना तेथे थांबवण्यापासून रोखले आणि वाद सुरू झाला, शिंदे यांनी स्पष्टीकरण देऊनही रिक्षा चालक संतापला आणि त्याने दादागिरी केली असल्याचा प्रकार समोर आला. स्टँडवर प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जाते आणि चौथ्या राईडच्या नावाखाली लोकांना बराच वेळ ताटकळत बसवले जाते असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एवढेच नाही तर वाहनचालक गणवेशाचे नियमही पाळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शरद शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे, वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी वाहतूक विभाग आणि आरटीओकडे केली आहे.
