– प्रताप सरनाईक ‘ॲक्शन मोड’वर


मीरा-भाईंदर, मीरा-भाईंदरच्या दळणवळणात क्रांती घडवणाऱ्या मेट्रो ९ च्या प्रवासाला गती मिळाली असली, तरी प्रवाशांना भेडसावणारी ‘कोंडी’ फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मैदानात उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आणि पार्किंगच्या भीषण समस्येची दखल घेत सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानक परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ‘येत्या दोन महिन्यात प्रवाशांच्या अडचणी सुटल्याच पाहिजेत,’ असा सज्जड दम भरत एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला २ महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे.
पाहणी दरम्यान समोर आले की, तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित आहे. बिल्डर आणि ७/११ कंपनी मालकाच्या जागेच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे हे काम रखडल्याचे समोर येताच सरनाईक यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या सोयीसाठी आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः ७/११ कंपनीच्या जागेबाबत त्यांनी मोठे विधान केले असून, केवळ १३३ मीटरच नव्हे तर संपूर्ण भूखंड एमएमआरडीएला देऊन तिथे भव्य *’पार्किंग प्लाझा’ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट्ससाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता, तो संपूर्ण भूखंडच ‘पार्किंग प्लाझा’साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. जर ७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे १५०० ते २००० खाजगी वाहनांची सोय होईल असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. “शहरातील जनतेने त्यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, आता त्यांनी जनतेच्या सोयीसाठी ही जागा द्यावी,” असे आवाहन करत मंत्री सरनाईक यांनी चेंडू ७/११ कंपनीच्या कोर्टात टाकला आहे. मेट्रो स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वत:ची गाडी पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा, अशी व्यवस्था पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात कि, “मेट्रो ही जनतेच्या सोयीसाठी आहे, त्रासासाठी नाही! काशिगाव स्थानकाबाहेर प्रवाशांना होणारा मनस्ताप मी सहन करणार नाही. जागा हस्तांतरण आणि तांत्रिक नावाखाली कामात दिरंगाई करणाऱ्यांना माझा स्पष्ट इशारा आहे—येत्या २ महिन्यांत एन्ट्री-एक्झिटचे दरवाजे उघडा आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा. ७/११ कंपनीच्या मालकाला माझी विनंती आहे की, ज्या जनतेने आपल्याला दोनदा निवडून दिले, त्या सामान्यांच्या सोयीसाठी आपला भूखंड एमएमआरडीएला द्यावा. रेडीरेकनर दराने मोबदला घ्या, पण तिथे भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहराला कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा. यात कुचराई खपवून घेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *