मुंबई: वारंवार निवेदन देऊनही तसेच मंत्री स्तरावर आदेश होऊनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले. भाऊसाहेब नळकांडे, अविनाश नळकांडे, रेखा नळकांडे, लीलाबाई नळकांडे, विठ्ठल नळकांडे, बापूसाहेब नळकांडे, सविता वाळके, विद्या टेमगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय, उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ०४/०९/२०२५ व ०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौकशी करून नियमानुसार मुदतीत उचित कार्यवाही करावी असे लेखी निर्देश दिले होते.सदर प्रकरणी बोगस धरणग्रस्तांना जमीन वाटप केलेली आहे.
उपअधिक्षक,भूमी-अभिलेख शिरूर यांनी सदर गटातील मोजणी प्रक्रीया होण्यासाठी दिलेल्या हरकत अर्जाची सुनावणी घेऊन आदेशावर २८/११/२०२५ ही तारीख असताना जाणूनबुजून ०८/०४/२०२६ ला निकालाची समज उशिरा दिली व तातडीने १०/०४/२०२६ ला प्रतिवादी यांच्याशी संगनमत करून मोजणी करण्याचा खटाटोप केला असा आरोप भाऊसाहेब नळकांडे यांनी केला आहे.
00000000
