डॉ डी एल कराड यांची मागणी


अनिल ठाणेकर
नाशिक, शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसात एकूण ९ गुन्हे दाखल असून ६ संशियतांना अटक केली आहे. हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे.  बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली हे  स्वागतार्ह आहे.  तक्रारदारांमध्ये ८ महिला तर १पुरुषाचा समावेश आहे. युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. या कंपनीतील महिलांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही. नाशिक जिल्ह्यात व शहरात अनेक उद्योग व आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून ज्या आस्थापना मध्ये महिला कर्मचारी काम करतात त्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन झाली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा.या बाबत वरील मागणी करण्यात आली.यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली मा. विकास माळी साहेब,कामगार उपायुक्त, नाशिक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सिताराम ठोंबरे, ॲड.तानाजी आप्पा जायभावे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे,कॉ मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, गौतम कोंगळे, छाया जाधव, विजया टिक्कल, कॉ हिरामण तेलोरे, युवराज पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *