शिवसेनाप्रमुखांची जन्मशताब्दी उत्साहात

मुंबई, दि. (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशाब्दीनिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१२ नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना  कचऱ्याच्या डब्यांचे वाटप मागाठाणे विधानसभा प्रमुख  अशोक म्हामुणकर व उपविभागप्रमुख चेतन कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मागाठाणे विधानसभा निरीक्षक, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, विधानसभा समन्वयक सुप्रिया बोवलेकर, उप विधानसभा समन्वयक तुकाराम पालव, महिला उपविधानसभा समन्वयक वैभवी तावडे, शुभदा सावंत, महिला शाखासंघटक माधुरी खानविलकर, शाखासमन्वयक योगेश देसाई, इतिश्री महाडिक, कार्यालयप्रमुख भास्कर सावंत, उपशाखाप्रमुख अनंत आंग्रे, दत्ताराम मोरे, चंद्रकांत धुमाळ, प्रतीक चव्हाण, अजिन वाळंज उपस्थित होते.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *