मुंबई, दि. (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक २, दहिसर  वतीने  कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक व व्याख्यानकार राजू देसाई उपस्थित होते. शाखा प्रमुख उत्तम परब , युवासेना कार्यकारिणी सदस्या धनश्री कोलगे, शिवसेना ग्राहक संघ राजन गावडे, उप शाखा प्रमुख जयवंत जाधव, ललित वेलोंडे, विनायक तलघे, सुनील कुडतरकर, गट प्रमुख प्रफुल राज, दर्शन घाडीगांवकर उपस्थित होते. शेखर  जांबावलीकर व महेश शेडगे यांनी स्पर्धेच्या नियोजनाची धुरा संभाळली. या प्रसंगी निष्ठावंत शिवसैनिक व स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *