५वी मायकेलाइट मॅरेथॉन
कुर्ला पश्चिम येथील सिईएस माइकल हाय स्कूल द्वारा आयोजित ५वी मायकेलाइट मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमाने कुर्ला परिसरातील नागरिकांना एकत्र आणत एकता आणि उत्साहाची भावना दृढ केली. या स्पर्धेत ७५० हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
“Run for Unity and Michaelites smile while running miles” या संकल्पनेवर आधारित ही मॅरेथॉन कुर्ला परिसरातील सर्वात मोठ्या सामुदायिक उपक्रमांपैकी एक ठरली. सहभागींचा उत्साह, शिस्त आणि क्रीडाभाव यामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
हा कार्यक्रम मुख्याध्यापिका डॉ. सॅव्ही मेंडोंका यांच्या नेतृत्वाखाली, संचालक जीन मोझेस गोम्स आणि संस्थापक मोझेस मायकेल गोम्स यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक पोलिसांच्या सहकार्यामुळे वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमास आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, पोलीस अधिकारी संतोष माने, मुंबई उत्कल स्कूलचे अध्यक्ष सूर्य गौडा तसेच समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सहभागींचा उत्साह अधिक वाढला.
५वी मायकेलाइट मॅरेथॉनने केवळ शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन दिले नाही, तर सामुदायिक ऐक्य अधिक बळकट करत कुर्ला परिसरासाठी एक स्मरणीय उपक्रम ठरला.
