ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते शुभारंभ
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा नौपाड्यात प्रथम नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते नालेसफाईला आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात नौपाडा परिसरात कोठेही पाणी साचू नये, याची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पाणी साचण्याची काही ठिकाणे आहेत. त्यात नौपाड्यातील काही ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी काळजी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यानुसार नाले सफाईसाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे यंदा शहरात पहिल्यांदा नौपाड्यात नालेसफाई सुरू झाली आहे.
प्रभाग क्र. २१ मधील लोकमान्य सोसायटी नाला, सोपान सोसायटी ते एम. एच. हायस्कूल नाला, नाईकवाडी नाला, सर्व्हिस रोडवरील भोईर हॉटेल ते कोपरी ब्रिज चिखलपाडी, रेल्वेमार्गावरील आनंद ब्रिज ते ठाणे प्लॅटफॉर्म क्र. १ आणि एमटीएनएल ते चिखलवाडी येथील नाल्यांच्या सफाईला आज शुभारंभ करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *