सबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी

कल्याण: कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात शासकीय जमिनीवर नियमांची पायमल्ली करून खासगी व्यक्तीला कायमस्वरूपी राहण्यासाठी घर बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून हे घर देणारे व इतर अनागोंदी कारभारा करणारे येथील उपअभियंता मदन हिरवे व त्यांचे सहाय्यक अधिकारी प्रशांत घुगे यांना त्वरित निलंबित करून त्यांच्या मालमत्तांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. कारवाई न केल्यास या विषयावर आंदोलन करण्याचा इशारा साळवे यांनी दिला आहे.

कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप विभागीय कार्यालय असून या कार्यालयाचा परिसर फार मोठा आणि व्यापक आहे. याच परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील एक चार खोलींचे  शासकीय विश्राम गृह सुद्धा आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय प्रमुख उपअभियंता मदन हिरवे आहेत व या परिसराचे आणि विश्राम गृहाचे देखभाल करण्याची जबाबदारी हे जुनियर इंजिनिअर प्रशांत घुगे यांची आहे. या कार्यालयाच्या परिसरात अनेक अशे कामे करण्यात आले आहेत ज्याची आवश्यकता नव्हती तरी बील काढण्याच्या उद्देशाने ती कामे केली असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे.

या कॅम्पस मध्ये वाघ नावाच्या एका माजी मंत्री यांच्या पीएच्या ड्रायव्हरला कायमस्वरूपी घर थाटून दिले गेले आहे. हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारे जर शासनाची जागा जमीन देता येत असेल तर आम्ही ही ते मिळवण्यासाठी उत्सुक आहोत आणि आम्ही त्याचे भाडे ही द्यायला तयार असल्याचे नोवेल साळवे यांनी सांगितले. याबाबत त्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्या नौकरीच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या आर्थिक आफरातफरी च्या माध्यमातून व्यक्तिगत रित्या जमा केलेल्या मालमत्तेची स्वतंत्र समिती तर्फे चौकशी झाली पाहिजे. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नोवेल साळवे यांनी दिला आहे.

०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *