अशोक गायकवाड
पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा आणि नवीन पनवेल शाखेच्यावतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त “एक कृतार्थ संध्याकाळ” या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार २६ मेला सायंकाळी ५.३० वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात “लोकनेता” या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन, निमंत्रितांचे कवी संमेलन तसेच अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, लोकनेते रामशेठ ठाकूर, पानिपतकार ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ कवी व चित्रपट निर्माते दिग्दर्शक रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कोमसापचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, युवा नेते नगरसेवक परेश ठाकूर, सुप्रसिद्ध गझलकार ए.के.शेख तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रा.एल.बी.पाटील, आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोमसापचे गणेश कोळी आणि संजय गुंजाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *