काही मेल-एक्स्प्रेस गाड्या १० दिवस शॉर्ट टर्मिनेट
राजेंद्र साळसकर
मुंबई : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वरील ट्रॅफिक व पॉवर ब्लॉकला मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्मवर पायाभूत सुविधा उभारणीसह विविध तांत्रिक आणि विकासकामे करण्यात येणार आहेत.
या ब्लॉकमुळे दिनांक २९ मेपासून पुढील १० दिवस काही अप मेल आणि एक्स्प्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.
दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:
गाडी क्रमांक १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२८१० हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस
गाडी क्रमांक २२१४४ बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक २२१०८ लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी:
गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – सीएसएमटी एक्स्प्रेस
सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आधुनिक सुविधा, प्रवासी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्यासाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
या कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन पर्यायी व्यवस्था लक्षात घेऊन करावे आणि रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000000
