एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा
मुंबई : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली पुरस्कृत बोरिवली येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन येथे सुरु असलेल्या ११ व्या एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उप उपांत्य सामन्यात जळगावच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेने मुंबईच्या उदयोन्मुख ओंकार टिळकला पहिला सेट ६-२५ असा गमावल्यानंतर पुढील दोन सेटमध्ये २५-६, २५-३ असे पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीच्या इतर निकाल
योगेश परदेशी ( पुणे ) वि वि निलांश चिपळूणकर ( मुंबई ) २५-१९, २५-६
मोहम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि अभिजीत त्रिपनकर ( पुणे ) २५-१६, २५-१५
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे.
मिताली पाठक ( मुंबई ) वि वि अंबिका हरिथ ( मुंबई ) २३-९, १८-२५, २५-४
समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि उर्मिला शेंडगे ( मुंबई ) २५-६, २५-१६
सोनाली कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) २२-१५, २५-७, २१-११
आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि मधुरा देवळे ( ठाणे ) २५-१०, २५-५
शिवनेरी सेवा मंडळाचा एकतर्फी विजय; मुस्कान शेखची नाबाद ९ मिनिटांची खेळी
शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबवर १९-२ (मध्यंतर १९-०) असा १ डाव व १७ गुणांनी धुव्वा उडवला. शिवनेरीच्या मुस्कान शेख (नाबाद ९ मि. संरक्षण व ४ गुण), त्रिशा गुप्ता (३.३० मि. संरक्षण व १ गुण), गावंगी पेडणेकर (३.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी सुरुवातीपासूनच पूर्ण वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी दिली नाही.
ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराची दमदार कामगिरी
यजमान व अनुभवी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने नवख्या संघशक्तीचा १३-०२ (मध्यंतर १३-०) असा १ डाव व ११ गुणांनी धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यात ओम समर्थ भारत संघाचे वर्चस्व स्पष्ट दिसून आले.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *