– तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा केला निषेध

कल्याण: वाढत्या महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रावादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला.

पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाई वरून कल्याण मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

वाढत्या महागाई मुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्य जानतेला महागाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाढलेली हि महागाई त्वरित कमी न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला.  या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी,   डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील,  कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

000000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *