मुंबई  : ज्येष्ठ झुंझार पत्रकार श्री अभय मोकाशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांच्याबद्दलच्या शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी शनिवार, ३० मेला सायंकाळी पाच वाजतां उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला मजला, वैश्य समाज कल्याण केंद्र, राजेंद्र नगर, एकता भूमि ३ शेजारी, साई सर्व्हिस सेंटरच्या अलीकडे, बोरीवली (पूर्व) येथे  ही शोकसभा होणार असून स्वर्गीय अभय मोकाशी यांच्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी सर्व पत्रकार, माध्यमकर्मी, हितचिंतक यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस  प्रवीण वराडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *