– राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
कल्याण : कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे हे आज दिवसभर कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात उपलब्ध असतांना देखील त्यांनी या आंदोलनात उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून कार्यकर्त्यांकडून खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत.
तर खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतेच भाजपा सरपंचांचे आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *