मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १२ च्या वतीने प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या प्रयत्नांतून मागाठाणे देवीपाडा परिसरात नवीन लादीकरण, गटार दुरुस्ती तसेच नाले दुरुस्ती आदी कामांना सुरुवात करण्यात आली. या विकासकामांचे भूमिपूजन शिवसेना उपनेते विनोद घोसलकर आणि उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक तथा सिनेट सदस्य शशिकांत झोरे, संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, विधानसभा संघटक मिलिंद साटम, समन्वयक सुप्रिया बोवलेकर, उपविधानसभा समन्वयक स्नेहल वैद्य, शुभदा सावंत, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखासंघटक माधुरी खानविलकर, शाखासमन्वयक योगेश देसाई, इतिश्री महाडिक, कार्यालयप्रमुख भास्कर सावंत, उपशाखाप्रमुख अजित वाळंज, संदीप दळवी, सुरेश नितोरे, दत्ताराम मोरे, प्रतीक चव्हाण, सदा परब, अनुराधा मोरे, मंदा चव्हाण, कन्हैयालाल मेस्त्री, प्रतापराव सूर्यवंशी, रत्नाकर गवस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
