अंबरनाथ : शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी दरवाढ व टंचाई विरोधात पेट्रोल पंपासमोर तीव्र धरणे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ येथे करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांना अंबरनाथ तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
गेल्या १२ वर्षात पेट्रोलच्या किंमती ३८ टक्क्यांनी तर डिझेलचे किंमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत तर मागील ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत ८ रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आलेल्या आहेत ही दरवाढ आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे असे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले.
याप्रसंगी शंभू म्हात्रे, रविष तांडेल, जयवंत पवार, अकबर खान, सोमनाथ मिरकुटे, शरद ठाकरे, रंजन येडवणकर, देवेंद्र भेरे, तुषार देसले, अनिल चिराटे, केतन पवार, अमोल सुरोशी, मोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅलन्स पर्यंत पोहोचले असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊन दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जनतेवर पडू दिला नाही पण मागील काही वर्षात तेलाचे भाव ५० ते ५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांच्या आसपास होते अशी वस्तुस्थिती यशपाल भिंगे यांनी मांडली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवराज अलंजाडे, नईम शेख, सुधीर जाधव, बिपिन भावार्थ, स्मिता बंगेरा व सहकारी, आसिफ काजी, जयवंत हरड, ज्योती पवार, गुरुनाथ देशमुख, आशिष दुप्पली, इशांत जाधव, दीपा तिवारी आदींनी मेहनत घेतली.
000000000
