कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दिनांक २८ मे रोजी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आरोग्य योगा अँड नॅचरोपॅथी, जीवन फाउंडेशन व डॉक्टर विजय कुकरेजा यांच्या नेतृत्वाखाली २५ दिवसीय योग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रम प्रसंगी मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग जिल्हा समन्वयक जीवन विचारे, ह.भ.प. कैलास महाराज नचिते, अनिल घरत, जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, स्मिता घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, प्रकाश रोहणे, मुख्याध्यापिका भावना कुंभार, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, प्रा. डॉ. संदेश जायभाय यांच्यासह योगा शिक्षक उपस्थित होते.
शरीराला स्वास्थ्य व मनाला शांतता देण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे सर्वोत्परी महत्त्व डॉक्टर विजय कुकरेजा यांनी विद्यार्थी प्राध्यापक व उपस्थित मान्यवर मंडळींना समजावून सांगितले. या योग महोत्सवाचा डिजिटल स्क्रीनवर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आमदारांनी देखील सर्वांना योगा बाबत योग्य मार्गदर्शन केले. या योग प्रशिक्षणाचा पाया जीवनदीप महाविद्यालयात आज रोवला गेला महाविद्यालयात योगा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.
