संघर्ष रहिवासी संघटनेचे केडीएमसी, पोलिसांना पत्र
कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी संघर्ष रहिवासी संघटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
टिटवाळा येथील इंदिरानगर स्मशानभुमी रस्ता विभागात सतत घरांमध्ये चोरी, दुचाकी चारचाकी वाहन चोरी, मोबाईल चोरी अशा अनेक चोरीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असुन महिला मुलींचे छेडछाड करणारे टपोरी मुले माणसं यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं रस्त्यावर बसून गांजा दारू बियर खुलेआम पित बसतात. या सर्व समस्यांबाबत संघर्ष रहिवासी संघटनेने स्थानिक पोलिस ठाणे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत. यावर लवकर ही समस्या मार्गी लागणार असल्याचे आश्वासन केडीएमसी आणि पोलीस प्रशासनाने दिले आहे.
