– दहा गुजराती ज्ञातींना मिळाला मागासवर्गीय दर्जा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गुजरातमध्ये अनेक जातींना इतर मागासवर्गीय समाजात मान्यता देण्यात आली आहे परंतु महाराष्ट्रात सुमारे दहा विविध ज्ञातींना इतर मागासवर्गीय ज्ञाती म्हणून मान्यता दिलेली नाही. यासाठी पुणे येथे खत्री आयोगाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराजभाई शाह यांनी अथक परिश्रम घेतले आणि ज्या दख्खनच्या राणीला नुकतीच ९६ वर्षे पूर्ण झाली त्या डेक्कन क्वीनचा पास काढून डॉ हेमराज शाह हे मुंबई हून सातत्याने पुणे येथे जात होते आणि न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे आर्जवे करीत होते. अर्ज विनंत्या करीत होते की आमच्या विविध ज्ञातींना इतर मागासवर्गीय म्हणून मान्यता देण्यात यावी. या विनंतीचा सहानुभूतीने विचार करुन मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येऊन त्यांना मान्यता देण्यात आली. गुजराती कडिया (४५), लुहार सुथार मिस्त्री (९२), नावी हज्जाम पाणंद (१०८), दर्जी सइ सुथार (१५३), घांची (३००), परजिया सोनी जव्हेरी (५३), लोहार (२६६), पंचाल (१२१), सुथार (१७५), मणियार (३०७) या ज्ञातींना अत्यंत परिश्रमपूर्वक प्रयत्नांती महाराष्ट्र सरकारने इतर मागासवर्गीय समाजात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला, जो डॉ हेमराज शाह यांच्या प्रशंसेला निश्चितच पात्र मानण्यात येतो. बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराजभाई शाह यांनी यासाठी एकहाती पाठपुरावा केला आणि त्यांच्या अनेक वर्षांची तपश्चर्या फळाला आली.  उपरोक्त दहा विविध प्रकारच्या ज्ञाती बांधवांच्या युवकांना डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले. हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून हे सर्व विद्यार्थी डॉ हेमराज शाह यांच्या ऋणात राहणे पसंत करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *