ठाणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप व ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चिंतामणी कोळी यांच्यातर्फे सलग १९ व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ठाणे शहरातील गरजू विद्यार्थी व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *